सामाईक खातेदार नुकसानभरपाईपासून दूरच 

Common account holders away from compensation
Common account holders away from compensation

पुनाळ : गतवर्षी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातले. शतकातला सर्वात मोठा पुर या महापुराला म्हटल गेले. घरं, माणसं, शेती अक्षरशः या पुराने उद्‌ध्वस्त केले. अगोदरच कर्जाच्या ओझ्यात दबलेला शेतकरी महापुरान पिकांचे नुकसान झाल्यामुळे पुराच्या गाळात रुतला. त्यानंतर पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने केली आणि बुडीत क्षेत्राचे पंचनामे केले. 

कर्जदार शेतकऱ्यांना 950 रुपये तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 405 रुपये प्रतिगुंठा बाधित क्षेत्रासाठी नुकसानभरपाई जाहिर केली. दरम्यान राज्यात सरकार बदलले आणि नवीनच सत्तेत आलेल्या महाआघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई दिली. परंतू या पुराच्या मदतीत सामाईक खातेदार शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र सापत्नीक वागणूक मिळाली. या सामाईक खातेदार शेतकऱ्यांचे लेखा परीक्षण वेळेत झाले नाही. त्यांना लाभ 405 रुपये की 950 रुपये प्रतिगुंठा द्यायचा हा वाद बरेच दिवस होता आणि शेवटी या सामाईक खातेदारांनाही 950 रुपये प्रतिगुंठा प्रमाणे लाभ द्यायचे निश्‍चित झाले. त्या अनुषंगाने संबंधित खातेदारांच्या कर्ज खात्यांचे लेखापरिक्षणही या महिन्याभरात पूर्ण झाले. परंतु अद्यापही या सामाईक खातेदारांना पूरग्रस्त मदतीचा लाभ मिळालेला नाही. 

एकीकडे जिल्हा सहकारी बॅंका सांगताहेत की, या 30 जुनअखेर जे शेतकरी पिक कर्जाची परतफेड करतील त्या प्रामाणिक शेतकऱ्यांना शासन 50 हजार रुपये मदत देणार आहे. पण जिल्ह्यातील या सामाईक खातेदार शेतकऱ्यांना रुपयाची मदत मिळाली नाही. याबाबत या शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे. 30 जुनपूर्वी त्यांचा पुरग्रस्त मदतनिधी कर्ज खात्यावर वर्ग होण्याची मागणी केली जात आहे. 

आम्ही जिल्हा उपनिबंधक यांना भेटलो व 30 जून पूर्वी सामाईक खातेदारांची मदत कर्ज खात्याला वर्ग करण्याची विनंती केली आहे. पूरग्रस्त मदतीविना जर हे शेतकरी शासकीय मदतीला मुकणार असतील तर आम्ही यंत्रणेला जाब विचारू. 
- विक्रम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी. 


दृष्टिक्षेप 
- सामाईक खातेदार महापुराच्या रकमेपासून दूरच 
- कर्ज खात्यांचे लेखा परिक्षण पूर्ण 
- 450 की 950 रूपये प्रती गुंठा भरपाईवरून वाद 
- 30 जूनपुर्वी रक्कम खात्यावर जमा करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com