esakal | व्हीआयपी दर्शनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार IDarshan
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Uddhav-Thackeray

व्हीआयपी दर्शनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. बंदी असताना त्यांना व्हीआयपी दर्शन दिल्याची चर्चा दिवसभर समाजमाध्यमांवरही होती. दरम्यान, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी व्हीआयपी दर्शनाच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे इ-मेलद्वारे तक्रार केली आहे. मंत्री परब यांनी नृसिंहवाडी येथे श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

आज मंदिराच्या आवारात पादत्राणे आढळली. ही पादत्राणे नेमकी कोणाची, याबाबतही सर्वत्र विचारणा होत होती. सायंकाळी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) भक्त समिती आणि प्रजास्ताक संस्था यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून पादत्राणे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीे केली.

नवरात्रोत्सवात व्हीआयपी व्यक्तींना थेट दर्शन देण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. यंदाही प्रशासनाने कोणालाही व्हीआयपी दर्शन देणार नसल्याचे जाहीर केले होते. आज मंत्री परब यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यांनी तिघांसह ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधितांवर कारवाईची मागणी

अंबाबाई (महालक्ष्मी) भक्त समितीने याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यास निवेदन दिले. या निवेदनातील माहितीनुसार, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलिस प्रशासनातर्फे अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी नियमावली, मोठा बंदोबस्त आहे. सामान्य भाविकाला दर्शन घेण्यासाठी प्रचंड कष्ट पडतात. यातच भर टाकत देवस्थान समितीने भाविकांना चप्पल, बूट काढण्यासाठी मेन राजाराम हायस्कूल येथे चप्पल स्टँड उभे केले आहे. ते साधारण मंदिरापासून २०० मीटर आणि रांगेपासून ४०० मीटर अंतरावर आहे. आज सकाळी मंदिरातील अतीबल्लेश्र्वर मंदिरापर्यंत काही उंची दर्जाचे बूट, चप्पल काढल्याचे दिसले. त्यामुळे आम्ही श्री अंबाबाई महालक्ष्मी भक्त समिती आणि पतितपावन संघटना यांच्यातर्फे सदर फोटोत दिसत असणाऱ्या चप्पल आणि बूट मालक, त्यांना व्हीआयपी वागणूक देणाऱ्यांवर कारवाई करावी. हे निवेदन महेश उरसाल, प्रमोद सावंत, सुनील पाटील यांनी दिले.

दरम्यान, प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या ई-मेलमधील माहितीनुसार, आज दुपारी काही चारचाकी गाड्या विद्यापीठ हायस्कूलसमोर आल्या. त्यातून काही राजकीय नेते, अधिकारी उतरले. त्यांना तेथील दरवाजातून थेट मंदिरात नेले. याची सर्व माहिती तेथील कर्मचाऱ्यांना आहे. सीसीटीव्हीमध्येही याचे फुटेज आहे. ते पाहून देवस्थान समितीने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच व्हीआयपी दर्शन कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी केली.

"मंत्री अनिल परब यांनी त्यांच्यासह तिघांचे दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. त्यांना कोणतेही व्हीआयपी दर्शन दिलेले नाही. त्यांची पादत्राणेही मंदिराबाहेरच होती."

-शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समिती

loading image
go to top