
पंचगंगा नदीची स्थिती शिरोलीच्या पुढे चिंताजनक
कोल्हापूर: पंचगंगा नदीच्या पाण्याची चाचणी ‘सकाळ’च्या राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीच्या निमित्ताने घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी नमुने घेऊन तपासणी केली. त्यातून पंचगंगा नदीची एकूण स्थिती शिरोली पुलापासून पुढे अतिशय चिंताजनक आहे. पाण्याचा रंग गढूळ असून, फॉस्पेटचे प्रमाणही अधिक आहे. तेरवाड बंधाऱ्याजवळ नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने तेथे जलपर्णी वाढली आहे. शिरोली पुलावाजवळ पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे २.४ इतका आहे. तर तिथून पुढेही विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमीच आहे. दुधाळी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प झाल्याने शहराच्या हद्दीमधील नदी पात्रातील पाण्याची स्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे.
पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘सकाळ’ने ‘पुन्हा साथ द्या, चला पंचगंगा वाचवूया’ हे अभियान राबवले. या अंतर्गत पिरळ ते नृसिंहवाडी या दरम्यान नदीपात्रातून राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे आयोजन केले होते. यात नदी पात्रातील पाण्याचे विविध बंधाऱ्यांजवळ नमुने घेतले. त्यांचे परीक्षण करून नदीतील पाण्याची स्थिती कशी आहे. याचा अहवाल शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने बनवला.
‘सकाळ’ राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने घेतले नमुने
Web Title: Condition Of Panchganga River Is Critical Beyond Shiroli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..