
कोल्हापूर : शहर आणि परिसरात अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज आणि पाणी योजनेचे काम सुरू आहे. ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यावर मध्यभागीच खोदाई करण्यात येत आहे.
चार फूट रुंदीची चर खोदून यात पाईप टाकली जात आहे. तसेच चेंबर तयार करण्यासाठी मोठी खोदाई सुरू आहे. सुर्वेनगर, बापूरामनगर उपनगरातील अनेक ठिकाणी मोठमोठ्या मशिनरीच्या सहाय्याने ही खोदाई सुरू आहे; पण ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदाई करून पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक उपनगरातील रस्ते म्हणजे पाणंद रस्ते झाले आहेत.
सुर्वेनगर, बापूरामनगर, आदिनाथ नगर तसेच नवीन झालेल्या कॉलनीत रस्त्यांना डांबरीकरण करण्यासाठी नागरिक महापालिकेकडे अर्ज-विनंत्या करत आहेत, तर अनेक कॉलनीमध्ये गटारी नसल्याने सांडपाणी वाहून नेण्यासाठी केवळ चर मारले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा रस्ते खोदून ठेवल्याने रस्त्यांवरून लाल माती पसरली आहे. पाऊस झाला की येथील रस्त्यावरून लालभडक पाणी वाहते; पण काही ठिकाणी रस्ते उकरल्याने सुर्वेनगर, बापूरामनगर, आदिनाथ नगर भागात मात्र या खोदाईने रहिवाशांना डोकेदुखी झाली आहे.
खोदाई केलेले रस्ते दलदलीने भरले आहेत. या रस्त्यांवर चिखलाने मोठमोठे खड्डे तयार होऊन त्यात पाणी भरले आहे. रस्त्यावरून चालणेही मुश्कील होत आहे. दुचाकी चालवताना तर नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याच्या मधोमध चिखलाचा थर झाल्याने आहे यात दुचाकीची चाके अडकून वाहन चालक पडल्याने किरकोळ अपघात होत आहेत. खोदाईचे काम पावसाळ्यात बंद ठेवावे आणि या रस्त्यावरील खोदाई केलेले चर मुरुमाने भरून चिखलापासून मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ड्रेनेज कामाचे पॅचवर्क झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलाचा झाला आहे. मेन रोडवरून कॉलनीत जाणे मुश्कील होत आहे. चालत येणेही कठीण होत आहे.
- राहुल शिंदे, बापूरामनगर
रस्ते प्रमाणापेक्षा अधिक खोदले आहेत. चर मुजवले नसल्याने रस्त्यावर पावसामुळे दलदल तयार झाली आहे. दुचाकी चालवणे मुश्कील झाले आहे. यावर मुरूम, खडी टाकून या रस्त्यांची सुधारणा करावी.
- मनोज पाटील, आदिनाथ नगर
दृष्टिक्षेप
- ऐन पावसाळ्यात खोदाईमुळे चिखलमय
- पावसाळ्यात खोदाई न करण्याची मागणी
- चिखलामुळे अपघाताचे प्रकार
- मुरूम, खडी टाकून रस्ते सुरळीत करणे गरजेचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.