
Kolhapur : सीपीआरमध्ये सध्या विविध इमारतींच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. अशात अधिष्ठाता कार्यालयाच्या इमारतीतील गोपनीय रेकॉर्ड विभागात दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, विभागातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे गठ्ठे अस्ताव्यस्त स्थितीत पडले आहेत. त्यामुळे काही महत्त्वाची कागदपत्रे खराब किंवा नष्ठ होण्याची शक्यता आहे. यातून काही गंभीर प्रकरणे दडपली गेल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न आहे.