esakal | कोल्हापूरमध्ये काँग्रेस आमदारांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MLA Rituraj Patil infected with corona corona infections  increased over the last twenty days

 जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे.  गेल्या वीस दिवसांपासून कोरोना बाधित येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

कोल्हापूरमध्ये काँग्रेस आमदारांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे.  गेल्या वीस दिवसांपासून कोरोना बाधित येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील युवा आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याने आता खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. .तसेच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. 

कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती त्यांनी केली आहे.

गेल्या वीस दिवसांपासून कोरोना बाधित येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात नवीन ८६८ स्वॅब तपासणीसाठी आले आहेत. ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजी, करवीर तालुका येथे कोरोना लक्षणे असणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यातील बहुतांश जण उपचाराला गेले असता त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतात. त्यातील बहुतेक जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

हेही वाचा- पीपीई किट, मास्कचा रोज तीन टन कचरा -


गेल्या २४ तासांत नव्याने बाधित सापडलेल्यांपैकी ४८ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. बाहेर गावावरून येणाऱ्यांची प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्ती स्थानिक असल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब विचारात घेता स्थानिक पातळीवर कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे बनले आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top