"देशातील अनेक पक्ष जर ईव्हीएमबाबत ही भूमिका मांडत असतील, तर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे."
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याने महायुतीला भरभरून यश दिले आहे. पुढच्या विकासाचे मॉडेल निर्माण करणे आता हे महायुतीच्याच आमदारांची जबाबदारी आहे. त्यामुळे हद्दवाढीचा (Kolhapur City Extension) निर्णय आता सत्तेत असलेल्या मंडळींनीच घ्यावा, आमच्या हातात काहीही नाही. पूर्ण बहुमत असलेले महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात काय काय होतंय, याची वाट कोल्हापूरकर पाहत आहेत, असे सांगत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी हद्दवाढीची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवरच ढकलली.