

Congress workers celebrate the party’s big win in Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ३४ जागांवर घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग क्रमांक एक व दोनमधील निकालात काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय निश्चित होताच कसबा बावडा, रमणमळा परिसर तसेच आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली.