कोगनोळी : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) कोगनोळी टोलनाक्यावर (Kognoli Toll Plaza) बुधवारी (ता. २१) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास तांदूळ वाहतूक करणाऱ्या कंटेनरने पेट घेतला. कंटेनर दावणगेरेहून मुंबईकडे जात असताना ही दुर्घटना घडली. त्यात मोठ्या वाहनासह टोलनाक्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.