
Kolhapur Electricity Board Safety Negligence : वारुळ (ता.शाहूवाडी) येथील गणेश किसन पाटील (वय ३०) या कंत्राटी वायरमनचा ११ हजार केव्हीच्या खांबावर काम करत असताना विजेचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला. वालूर येथे वनविभागाच्या नर्सरीजवळील खांबावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.