कोल्हापूर : अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे झिया खान (Pyare Khan) हे छत्रपती शिवाजी चौकात (Chhatrapati Shivaji Chowk) अभिवादन करण्यासाठी येणार असल्याने येथील एक फलक हटविण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरू होत्या. दरम्यान, हा फलक हटवू नये, यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने चौकात जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार सुरू होता.