
-सुनील पाटील
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या भवानी मंडपातील मेन राजाराम हायस्कूलची नोंद जिल्हा परिषदेच्या नावावर केली जाणार होती. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तशी ग्वाही दिली होती. मात्र, केसरकर यांनी चालढकल केली. त्यानंतर ते पालकमंत्रिपदावरून पायउतार झाले. ही नोंद अद्यापही झालेली नाही. याउलट या शाळेच्या जागा इतर कामासाठी वापरता येईल का? याची चाचपणी सुरू केली आहे.