esakal | सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव; शेतकऱ्यांमागे संकटांची मालिका
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव; शेतकऱ्यांमागे संकटांची मालिका

सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव; शेतकऱ्यांमागे संकटांची मालिका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महापुरात नदीकाठच्या शेतीतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना महापुरापासून बचावलेला सोयाबीन आता तांबेऱ्यामुळे अडचणीत आला आहे.

हेही वाचा: राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले; सलग चार दिवस मुसळधारेचा इशारा

शिरोळ तालुक्यात ऊस, भाजीपाला आणि सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुरात नदीकाठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा सोयाबीनला फटका बसला. महापुरात झालेल्या पिकाच्या नुकसानीतून शेतकरी अद्याप बाहेर पडला नसताना पुन्हा सोयाबीनवरील तांबेऱ्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या अनेक भागातील सोयाबीन पक्वतेच्या अवस्थेत आहे. काही भागातील सोयाबीन पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. अपक्वतेच्या अवस्थेततील सोयाबीनला तांबेऱ्याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. उत्पादन घटून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. जून दरम्यान सोयाबीनची पेरणी केली. यानंतर पक्वतेत बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी चार-चार वेळा औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या.

चांगला दर असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. काही सोयाबीन महापुरात गेला तर काही सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव जाणवू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

"जून महिन्यात सोयाबीन पेरणी केली. बदलत्या वातावरणामुळे चार-चार वेळा औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र फारसा फरक पडलेला नाही. तांबेऱ्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे."-संदीप खामकर, सोयाबीन उत्पादक शेतकरी

"परिपक्व झालेल्या सोयाबीनवर तांबेऱ्याचा फारसा फरक पडणार नाही. तालुक्यातील बहुतांश सोयाबीन पक्व झाला आहे. पक्वतेच्या प्रक्रियेत असणऱ्या सोयाबीनला याचा काहीसा फरक पडू शकतो." -गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, शिरोळ

loading image
go to top