कोरोना,ओमीक्रॉनची धास्ती: जोतिबा डोंगरावर तुरळक भाविक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiba temple
कोरोना,ओमीक्रॉनची धास्ती: जोतिबा डोंगरावर तुरळक भाविक

कोरोना,ओमीक्रॉनची धास्ती ; जोतिबा डोंगरावर तुरळक भाविक

जोतिबा डोंगर : कोरोना नंतर येणाऱ्या ओमीक्रॉनच्या(Omicron) धास्ती लॉकडाऊन (Lockdown)भीती व तसेच राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केल्याने आज राज्यभरातील पन्नास टक्के भाविकांनी जोतिबा डोंगराकडे पाठ फिरविली .सलग तीन महिने डोंगर हाऊस फूल्ल होता. आज च्या रविवारी मात्र डोंगरावर तूरळक गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.दरम्यान, नवरात्र उत्सव काळात जोतिबाचे मंदिर झाले त्यांनंतर मात्र डोंगर हाऊस फूल्ल (Housefull)झाला. रविवार व पौर्णिमेला दीड लाख भाविक डोंगरावर आले. मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. इतर दिवशी ही दररोज तीस चाळीस हजार भाविक येत होते. मोठ्या गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतरा पर्यंत दर्शन रांग लागल्या. ठाकरे मिटके गल्लीतून ज्योतिबा एसटी बस स्थानकापर्यंत दर्शन रांग लागल्या. भाविकांना या गर्दीत श्रींचे दर्शन घेतले .

हेही वाचा: नागपूरला ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर केले ; महापौर दयाशंकर तिवारी

लॉक डाऊन (Lockdown)झाल्यावर सुमारे वर्षभर देवाचे दर्शन घेता येणार नाही. या आशेने भाविक सहपरिवार डोंगरावर आले. या गर्दीमुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. आज मंदिरात पहाटे घंटानादानंतर धार्मीक कार्यास प्रारंभ झाला. त्यानंतर पाद्यपूजा, काकड आरती मुखमार्जन झाले.त्यानंतर अभिषेक विधी झाला . त्यानंतर श्रीची सरदारी महापूजा बांधण्यात आली. आज पहाटेपासूनच डोंगरावर तूरळक गर्दी होता. आज भाविकांनी दाट धूके, उन्ह, सावलीच्या खेळाचा व अगदी निवांत दर्शनाचा आनंद लुटला. आज मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, यमाई मंदिर व बाग या ठिकाणी भाविकांनी घरातून आणलेल्या शिदोरीचा घेतली. डोंगर आज शोशल ड्रिस्ट्रींगचा फज्जा उडाला .पंचाहत्तर टक्के भाविकांकडे मास्कच न्हवते. भाविक बिनधास्त फिरत होते. रात्री भव्य असा पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल खोबऱ्याची भव्य अशी उधळण झाली. चांगभलच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला.आज डोंगरावर कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरिक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top