नागपूरला ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर केले ; महापौर दयाशंकर तिवारी

आयसोलेशन हॉस्पिटलचा अपवाद वगळता सर्वच प्रकल्प सुरू असून ऑक्सिजनबाबत महापालिका आत्मनिर्भर आहे
Oxygen
Oxygen sakal

नागपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची(oxygen) मोठी कमतरता भासली. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच कोविड हॉस्पिटलमध्ये (Covid hospital)ऑक्सिजन प्रकल्प सुरू केले. आयसोलेशन हॉस्पिटलचा (Isolation Hospital)अपवाद वगळता सर्वच प्रकल्प सुरू असून ऑक्सिजनबाबत महापालिका आत्मनिर्भर (self-reliant)आहे. हे सर्व प्रकल्प सीएसआर फंडातून करण्यात आल्याने महापालिकेवर खर्चाचा भारही पडला नाही, असे आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

Oxygen
हिंसाचारानंतर आसाम-मिझोरामचे मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला

महापौरपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. त्यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा मांडला. केलेल्या कामावर संतुष्ट आहे, परंतु समाधानी नाही, असे नमुद करीत कोरोनाचा काळ, आचारसंहितेचा काळात कामे शक्य झाली असती तर शहराच्या सुविधांमध्ये आणखी भर घालता आली असती, असेही ते म्हणाले.

Oxygen
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक बंदोबस्त करा!

शहरात शिक्षण व आरोग्य सुविधांवर भर दिल्याचे नमुद करीत ते म्हणाले, ७५ वंदे मातरम हॉस्पिटलपैकी भिवसेनखोरी व पांढराबोडी येथे प्रत्येकी एक, असे दोन सुरू झाले. कोरोना काळ तसेच आचारसंहितेमुळे इतर रखडले. परंतु येत्या काही दिवसांत आणखी ५० सुरू होतील. केंद्राने ५१ अर्बन पब्लिक हेल्थ सेंटरला मंजुरी दिली. आतापर्यंत शहरात २४ यूपीएचसी होते. त्यात आणखी चौदाची भर पडणार आहे. ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत आहे. दुभाजकांवर ध्वनी व वायू प्रदूषण करणारी झाडे लावण्यात येणार आहे. विद्यापीठात १९९ बेडचे हॉस्पिटल येत्या शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे.(Nagpur News)

Oxygen
पुणे : अमित शहांच्या सचिवांनी गिरविले अनास्करांकडून धडे

शिक्षणाच्या बाबतीतही महत्त्वाचे निर्णय झाले. सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या असून पुढील वर्षीपासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू होतील. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना खेळातून विज्ञानाचे धडे देण्यासाठी गरोबा मैदान येथील मनपा शाळेत विज्ञान संशोधन केंद्र सुरू करण्यात येत असून यासाठी पाच कोटी रुपयांंचा खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांंनी सांगितले. मध्य नागपुरातील बजेरिया क्षेत्रात भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. १२ हजार वर्गफूट क्षेत्रफळात चार मजली इमारत सर्व सोयींनी युक्त राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Oxygen
यवतमाळ : किती हा भ्रष्टाचार? हाताने खणला जातोय रस्ता

कचऱ्यातून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन

कचऱ्यापासून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन करणाऱ्या कंपन्यांचे प्रस्ताव आले आहे. चेन्नई येथील कंपनीला दोन एकर जागा देण्याचा निर्णय झाला त डच येथील कंपनीबाबतही सकारात्मक विचार सुरू आहे. दोन्ही प्रस्ताव सभागृहात येईल. डच कंपनीने एक हजार टन कचऱ्यावर प्रकिया करून सीएनजी निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. या कंपन्यांना पैसा द्यावा लागणार नसून सीएनजी विक्रीतून मनपालाही वाटा मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

नगरसेवकांच्या माध्यमातून दुसरा डोस

शहरातील लसीकरणासाठी पात्र सर्वच नागरिकांनी पहिला डोस घेतला. परंतु दोन लाख नागरिकांनी अद्यापही दुसरा डोस घेतला नाही. या सर्वांची यादी बोलावण्यात आली. नगरसेवकांंना त्यांच्या त्यांच्या प्रभागातील नागरिकांची नावे देण्यात येणार आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून दुसरा डोस पूर्ण करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून आजही विविध भागात त्यांचे लसीकरण सुरू होते, असेही महापौरांनी नमुद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com