कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गुरूवारी 1316 बाधित 

०
०
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी रात्री बारा ते बुधवारी रात्री बारापर्यंत एक हजार 316 नवे कोरोनाबाधित सापडले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आजवरचे सर्वाधिक बाधित गुरूवारी आढळले. त्यामुळे हा दिवस कोरोनाच्या उद्रेकाचा ठरला. याच कालावधीत 689 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एकूण कोरोनामुक्तांची संख्या 20 हजार 11 इतकी झाली. आजवरच्या बाधितांची एकूण संख्या 31 हजार 618 इतकी झाली आहे. दिवसभरात 24 बाधितांचा मृत्यू झाला. 

महिन्याभरापासून कोल्हापूर शहर, इचलकरंजी, करवीर, हातकणंगले भागात बाधितांची संख्या अद्याप वाढतेच आहे. यातील जवळपास 168 व्यक्ती गंभीर आहेत. त्यांच्यावर सीपीआरसह पाच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना ग्रामीण भागातील कोविड सेंटरवर उपचार सुरू आहेत. 

अशात गेल्या दोन दिवसात किमान 1200 हून अधिक व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने तेवढ्या संख्येने बेड रिकामे झाले होते; मात्र आज दिवसात बाधितांची संख्या उच्चांकी प्रमाणात वाढली आणि त्याने मोकळे झालेले सर्व बेड भरून गेले. दिवसभरात एक हजार 862 व्यक्तींचे नव्याने स्वॅब तपासणी घेण्यात आले. त्यामुळे दोन दिवसात बाधितांची आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. यापुढे दोन दिवसात कोरोनामुक्‍तांची संख्या तेवढी वाढली नाही तर पुन्हा नव्या बाधितांसाठी बेडचा प्रश्‍न जटिल होणार आहे. त्यानुसार आज जिल्ह्यातील 14 कोविड सेंटरवर सौम्य लक्षणे असलेल्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात आला. 

तालुकानिहाय बाधित
कोल्हापूर शहर 385, इचलकरंजी 115 , शिरोळ 42 , करवीर 132, हातकणंगले 117, कागल 13, आजरा 12 , पन्हाळा 34, गडहिंग्लज 13, राधानगरी 32, शाहूवाडी 29, अन्य राज्य 54 

     जिल्ह्याचे कोरोना मीटर

  • एकूण कोरोनाग्रस्त --- 31 हजार 618 
  • एकूण कोरोनामुक्त --- 20 हजार 11 
  • आजअखेरचे मृत्यू  ---------958 
  • सध्या उपचार घेणारे ---- 10 हजार 649 

शहराची चिंता वाढली 
गेल्या 24 तासात नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक 385 रूग्ण सापडले आहेत. शहरातील चिंता वाढली आहे. सीपीआर रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व अन्य पाच खासगी रुग्णालयात बहुतांश बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com