esakal | .....म्हणून 'त्या' गर्भवतीला आपल्या बाळासह गमवावा लागला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

 corona impact pregnant  women Death with  baby due to lack of treatment  in  bachhe Savarde

बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील घटना

.....म्हणून 'त्या' गर्भवतीला आपल्या बाळासह गमवावा लागला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोडोली (कोल्हापूर)  : बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान उपचाराअभावी सोमवारी पहाटे बाळासह मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार नाकारणाऱ्या डॉक्‍टर व हॉस्पिटलविरुद्ध चार दिवसानी कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


संबंधित महिलेच्या पतीन पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,

वारणानगर येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांची पत्नी उपचार घेत होती. डॉक्‍टरांनी प्रसूती वेदना सुरू झाल्यावर हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे रविवार पहाटे वेदना जाणवू लागल्यावर हॉस्पिटलच्या दारात पोहोचल्यावर गेट उघडले नाही. खिडकीतूनच दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. पहाटेपर्यंत अन्य चार हॉस्पिटलमध्ये गेलो तथापी त्यांनी असमर्थता दर्शवली.

हेही वाचा- कोल्हापूरमध्ये काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण -

कोल्हापुरात हॉस्पिटलमध्ये नेताना महिलेचा बाळासह वाटेतच मृत्यू झाला. उपचार नाकारणाऱ्या डॉक्‍टर व हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यास कोडोली पोलिसांत संबंधित जवान हेलपाटे मारत होते. अखेर सुरक्षा दलाच्या वरिष्ठांनी आदेश काढल्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top