esakal | कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मुक्तसंचार ठरतोय डोकेदुखी; इचलकरंजी प्रशासनाला नाकेनऊ

बोलून बातमी शोधा

corona patients problems to other people in ichalkaranji face health department

रुग्णालयाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. बाधित रुग्णांचा मुक्तसंचार वाढत्या कोरोना संसर्गालाच बाधित  ठरू शकतो.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मुक्तसंचार ठरतोय डोकेदुखी; इचलकरंजी प्रशासनाला नाकेनऊ

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात कोरोना बाधितांचे शतक पार झाले तरी बाधित रुग्णांना स्वयंशिस्त येत नसल्याचे दिसत आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना अनेकजण उशिरा रिपोर्ट घेऊन उपचारासाठी दाखल होत आहेत. अशा अनेक घटना आयजीएम रुग्णालयात घडत आहेत. ही रुग्णालयाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. बाधित रुग्णांचा मुक्तसंचार वाढत्या कोरोना संसर्गालाच बाधित  ठरू शकतो.

सध्या शहरात आयजीएमसह विविध खासगी लॅबद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. शहरातील केवळ आयजीएम व खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीनंतर बाधित रुग्णांची काटेकोरपणे नोंद नगरपालिकेकडून घेतली जात आहे. मात्र शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून अनेकजण कोरोना चाचणी करत आहेत. यातून बाधित झालेले रुग्ण उपचारासाठी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल घेऊन शहरातील आयजीएम रुग्णालयात येतात. मात्र बाधित झाल्यानंतर खूप दिवसांनी हे रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाधित झाल्यानंतर तो रुग्ण किती ठिकाणी फिरला, त्याचा ट्रेस लावताना आरोग्य यंत्रणेला अडचणीचे होत आहे.

हेही वाचा - कोल्हापूर : इचलकरंजीत मोठ्या घडामोडींचे संकेत, आवाडे-हाळवणकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

काही दिवसांपूर्वी आयजीएम रुग्णालयात दोन बाधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी उपचारासाठी दाखल झाले. उशिराने घेतलेले उपचार स्वतःसाठी व इतरांसाठी घातक ठरते. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासन निर्बंधांची पायमल्ली जितकी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. तितकेच कोरोना बाधित रुग्णांकडून होताना दिसत आहे. घरी विलगीकरण केलेल्या रुग्णांकडून योग्य शिस्तीचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे वाढल्या आहेत. सध्या इचलकरंजी शहरात तपासणीच्या तुलनेत कोरोना बधितांचे प्रमाण 16 टक्क्यांवर पोचले आहे. सुमारे 118 बाधित रुग्ण शहरात असताना कोरोना बाधित रुग्णांकडून आता स्वयंशिस्त अत्यंत गरजेची आहे. तरच प्रशासनाला कोरोनाला अटकाव करणे सोपे जाईल.

खाजगी लॅबवर हवे नियंत्रण

अनेकांचा खाजगी लॅबमधून कोरोना चाचणी करण्याचा कल वाढला. दैनंदिन बाधित होणाऱ्या सर्वाधिक रुग्णांची संख्या खाजगी अहवालानुसार आहे. त्यामुळे शहरात व शहराबाहेरील होणाऱ्या खाजगी कोरोना चाचणींवर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाची त्यादिवशीच पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंद होणे आवश्यक आहे.

"बाधित झाल्यानंतर अनेक रुग्ण उशिरा उपचारासाठी येत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचीच भीती वाढते. बाधित रुग्णांनी आपल्यापासून वाढणारा धोका लक्षात घेवून वेळेत उपचार घ्यावेत."

- डॉ. आर. आर. शेट्टे, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम