‘त्या’कुटुंबावर आभाळच कोसळले ;अन् सहानुभूतीने पाणावले आख्या गावाचे डोळे 

corona positive all family in kolhapur gadhinglaj
corona positive all family in kolhapur gadhinglaj

कसबा तारळे (कोल्हापूर) - ते शिक्षक व सहचारिणी शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतलेली. म्हटलं तर दोघांचा संसार सुखाचा; परंतु दुःख त्यांच्या पाचवीलाच पूजल्यासारखे. आता कुटुंबप्रमुखासह कन्या, पुतण्या आणि बहिणीला कोरानाचा संसर्ग झाल्याने दुर्दैवी प्रसंगाला हे सारे कुटुंब सामोरे जात आहे. आभाळ कोसळणे म्हणजे नेमके काय याचा प्रत्यय हे कुटुंब घेत आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिक्षक म्हणून ‘त्यांचा’ नावलौकिक होता. त्यांनी जिल्हा बदली अंतर्गत गावापासून जवळच असलेल्या राधानगरी तालुक्‍यातील शाळेत बदली करून घेतली. पत्नीने नोकरी नसल्याने प्रशिक्षणाचे वर्ग घरी सुरू केले होते. त्यांचा हा नित्यक्रम सुरू  असतानाच अकरा वर्षांच्या मोठ्या मुलीला कर्करोगाने गाठले. दुसरी तीन वर्षांची मुलगी तीही अपंग. आई-वडिलांचे छत्र आधीच हरवलेलं. त्यात दोन भावांनीही जगाचा निरोप घेतलेला. दोन विधवा वहिनी. एकीला दोन मुली तर दुसरीला मुलगा. भावांच्या निधनानंतर दोन्ही कुटुंबांची जबाबदारीही ‘त्यांच्या’वरच आली. पुतणीचे लग्न बहिणीच्या मुलाशी लावून दिले. मोठ्या मुलीच्या उपचाराच्या निमित्ताने मुंबई गाठली.

अपंग मुलीची आबाळ होऊ नये म्हणून पत्नीला मुलीसह माहेरी नांदेड येथे ठेवले. अन लॉकडाउन जाहीर झाल्याने तेथेच अडकले. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर ते पुन्हा मुलीला घेऊन मुंबईला दाखल झाले. सोबतीला कागल तालुक्‍यातील बहिणीला व  पुतण्याला नेले. तेथे कोरोनाने प्रथम बाप-लेकीला गाठले. अन्‌ त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा परिस्थितीत सीपीआरची वाट धरली. येथे ते दाखल झाले अन लगेच दुसऱ्या दिवशी सोबत नेलेल्या बहीण आणि पुतण्याचाही अहवाल पॉझिटिव्‍ह आला. गावातील कुणाशीही तसेच गावी असलेल्या अन्य नातेवाइकांशी त्यांचा संपर्क झालेला नसला तरीही या एकाच कुटुंबातील तिघांना आणि सोबत असलेल्या बहिणीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने ग्रामस्थही हळहळ व्यक्त करीत आहेत. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  


संकटांची मालिकाच
कष्टाचे चार पैसे हमखास देणारी सुखाची आणि आवडीची सरकारी नोकरी आहे म्हणून त्यांनी या तिन्ही कुटुंबांचा भार पेलला आहे. परंतु एक मुलगी कर्करोगग्रस्त आणि दुसरी अपंग अशा स्थितीत संसार नेटाने चालवणाऱ्या बापासह लेकीला आणि जवळच्या दोन नातेवाइकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने कुटुंबाची अवस्था दयनीय झाली आहे.


‘त्या’ चौघांचा गावाशी संपर्क नाही
कसबा तारळे ः मुंबईतून थेट सीपीआरमध्ये शुक्रवारी दाखल झालेले दोन व आजचा एक, तसेच एक माहेरवाशीण अशा चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला खरा; परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते गावच्या संपर्कातच नसल्याने खिंडी व्हरवडे गाव कोरोनामुक्त  आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सीमा बंद केल्याचे पोलिसपाटील राजाराम पवार यांनी सांगितले.  


सोनगेतील महिलेचा गावाशी संपर्क नाही
म्हाकवे ः कागल तालुक्‍यातील सोनगे येथील ती पॉझिटिव्ह महिला डिसेंबरपासून मुंबईत रुग्णाची सेवा करण्यासाठी गेली होती. सहा महिन्यांपासून महिलेचा गावाशी संपर्क नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सोनगेचे उपसरपंच प्रल्हाद देवडकर यांनी केले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com