esakal | धक्कादायक : दुकानदाराला दमदाटी करून हजारो किलो धान्यावर नगरसेवकांचा डल्ला  
sakal

बोलून बातमी शोधा

corporator rod in grain supply kolhapur hatkanangale

आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मे आणि जून दोन महिन्यांसाठी माणसी दहा किलो तांदूळ मोफत देण्याची योजना जाहीर केली.

धक्कादायक : दुकानदाराला दमदाटी करून हजारो किलो धान्यावर नगरसेवकांचा डल्ला  

sakal_logo
By
अतुल मंडपे

हातकणंगले (कोल्हापूर) - लॉकडाऊनच्या काळात बिगर रेशनकार्डधारकांना वाटपासाठी आलेल्या हजारो किलो धान्यांवर हातकणंगले येथील काही नगरसेवकांनी डल्ला मारला असून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी केलेल्या कारभारामुळे अनेक मूळ लाभार्थी वंचित राहीले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. या प्रकाराने परिसरांत खळबळ उडाली आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जांच्याकडे रेशनकार्ड नाही असे नागरिक केवळ रेशनकार्डाअभावी उपाशी राहून नयेत यासाठी शासनाने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मे आणि जून दोन महिन्यांसाठी माणसी दहा किलो तांदूळ मोफत देण्याची योजना जाहीर केली. त्यासाठी सर्वेक्षण करून ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशांची यादी बनविण्याची सूचना दिली. हातकणंगले नगरपंचायतीने यानुसार शहरांतील ६७० जणांची यादी तयार करून शासनाकडे पाठवली. शासनाने धान्य वाटपांसाठी एका संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाची निवड करून ६७७० किलो तांदूळ त्या दुकानात पाठवले. धान्य वाटताना यादीतील नावाप्रमाणे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि सही घेण्याचे आदेश शासनाने दिले. तसेच जे लाभार्थी धान्य नेणार नाहीत त्यांचे शिल्लक तांदूळ परत देण्याच्याही सूचना देण्यांत आल्या. त्यानुसार संबंधित धान्य दुकानात आल्यानंतर संबंधित दुकानदाराने काही लाभार्थ्यांना धान्य वाटप केले. मात्र याची माहिती मिळताच काही नगरसेवकांनी दुकानदाराला दमदाटी करत आमच्या वॉर्डातील लोकांना आम्ही वाटतो असे म्हणत हजारो किलो तांदूळ स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यांनी स्वतःचे हितसंबंध जपत त्यांच्या बगलबच्यांना धान्य दिले. मात्र, यामध्ये अनेक मूळ लाभार्थी वंचित राहीले आहेत तर ज्यांना धान्य दिले आहे त्यामध्ये कित्येक केशरी रेशनकार्डधारकांचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. शिवाय नगरसेवकांनी जादा तांदळाची मागणी केल्यानंतर दुसऱ्या एका स्वस्त धान्य दुकानांतून तब्बल वीस पोती धान्य घेऊन नगरसेवकांना दिल्याचीही कबूली दिली आहे. त्यामुळे त्या दुकानदाराकडे एवढे अतिरिक्त तांदूळ कोठून आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाकडून मोफत वाटपासाठी आलेल्या धान्यांचा संबंधित नगरसेवकांनी स्वतःचे हितसंबंध जपण्यांसाठी गैरवापर केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

हे पण वाचा कोल्हापूर - माजी सैनिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

''काही नगरसेवकांच्या दमदाटीमुळे त्यांना नाईलाजास्तव तांदूळ दिले आहेत. मात्र यांच्या राजकारणात आमचा बळी जाणार आहे.'' 

-स्वस्त धान्य दुकानचालक 

या प्रकाराची माहिती घेतली असता काही नगरसेवकांनी हजारो किलो धान्य घेऊनही त्याचे वाटप केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे.
-अरूण कुमार जाणवेकर, नगराध्यक्ष ..हातकणंगले.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन दोषीवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.
 -प्रदिप उबाळे, तहसीलदार, हातकणंगले.


संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top