
बांबवडे : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील खोरी नावाच्या शेतात अघोरी पूजा करताना मंगळवारी दांपत्यासह सहाजणांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली. त्यात भोंदूसह एका माजी सैनिकाचा समावेश आहे. रविवारपासून सुरू असलेला हा प्रकार मंगळवारी ग्रामस्थांमुळे उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.