कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्चला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर त्याला पाच दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा (Prashant Koratkar) जामीन अर्ज सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी फेटाळला. कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) आहे.