esakal | शववाहिकांवरचा ताण वाढला; मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना पहावी लागतेय वाट
sakal

बोलून बातमी शोधा

शववाहिकांवरचा ताण वाढला; मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना पहावी लागतेय वाट

शववाहिकांवरचा ताण वाढला; मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना पहावी लागतेय वाट

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : कोविड मृतदेह (covid-19 dead) नेण्यासाठी दोन शववाहिका असल्याने एका शववाहिकेतून तीन ते चार मृतदेह नेण्याची वेळ अग्निशमन दलाच्या (fire briged emolyees) चालकांवर आली आहे. २४ तासांत किमान ५० मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीकडे पोचविले जातात. कोविड मृतांची (covid-19) संख्या वाढत चालल्याने एकाचवेळी मृतदेह न्यायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयातील (private hospitals) मृतदेह शववाहिकेतून पोचविले जातात. वर्दी दिल्यावर शववाहिका कधी येईल, याचा नेम नसल्याने मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांना ताटकळत बसावे लागते.

शववाहिकेवरील चालक जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. वर्दी देऊन अर्धा तास झाला तरी शववाहिका येत नाही. त्यामुळे नातेवाईकांची जीवाची घालमेल सुरू आहे. गेल्या महिन्यापासून कोविडच्या मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून यात लक्षणीय वाढ झाली आहे. किमान १५ मृतदेह हे वेटिंगवर राहत आहेत. ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी एक शववाहिका दिली. अग्निशमनच्या ताफ्यातील आणखी एक शववाहिका सेवेत आहे.

हेही वाचा: सीपीआरमधील कोविड योद्धे; काहींना संसर्ग तरी अहोरात्र सेवा

कोविड मृतदेहांचा भार पेलवत नसताना कोविड नसणारे मृतदेह अन्य शववाहिकेतून स्मशानभूमीत नेले जातात. ठोक मानधनावरील ३० चालक रात्र आणि दिवस ही सेवा बजावत आहेत. शववाहिकेच्या अंतर्गत बदल करण्यात आले. पूर्वी जे स्ट्रेचर होते, ते काढले आहेत. एका वेळी चार ते पाच मृतदेह कसे बसतील, अशा प्रकारे अंतर्गत रचना केली आहे. सीपीआर तसेच सर्व खासगी दवाखान्यातील वर्दी अग्निशमन दलाकडेच येतात.

पंचगंगा स्मशानभूमीत गाडी गेल्यावर ती सॅनेटायझर करणे, पुन्हा ताराराणी चौक येथे येऊन पीपीई कीट काढणे, अंघोळ करणे, पुन्हा नव्या वर्दीला सामोरे जाणे, असा नित्यक्रम बनला आहे. किमान कोविडच्या काळात तरी शववाहिका वाढवाव्यात कर्मचाऱ्यांचा ताण कमी करावा. आठ हजार पगारात हे कर्मचारी राबत आहेत. किमान पगार तरी वेळेवर व्हावेत, हीच अपेक्षा बाळगून आहेत.

"कोविड मृतदेहाच्या दहनास विलंब होत असल्याने अन्य मृतदेह घेऊन आलेली शववाहिका स्मशानभूमीत थांबून राहते. ती येईपर्यत दुसरी वर्दी लागू होते. दोन शववाहिका कोविडच्या मृतदेहासाठी आहेत. संख्या वाढविण्यासाठी काही मार्ग निघतो का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

- रणजित चिले, प्रभारी प्रमुख, अग्निशमन दल

हेही वाचा: ‘म्युकोरमायकोसिस’चा वेळीच ओळखा धोका