esakal | सीपीआरमधील कोविड योद्धे; काहींना संसर्ग तरी अहोरात्र सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआरमधील कोविड योद्धे; काहींना संसर्ग तरी अहोरात्र सेवा

सीपीआरमधील कोविड योद्धे; काहींना संसर्ग तरी अहोरात्र सेवा

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : सीपीआरमध्ये (CPR hospital) कोरोनाची ड्यूटी लागली, (covid-19 duty) मनात भीती अन् हूरहूर होती. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणे धोकादायक, (covid-19 patients) या बातम्या कानावर धडकत होत्या. घरी पती, सासूबाई, मुलगा असल्याने त्यांची काळजी होती. त्यांना मलकापूर (ता. शाहूवाडी) गावी नेऊन सोडले. मैत्रिणीसोबत कोल्हापुरातील भाड्याच्या खोलीत राहिले. मार्च ते सप्टेंबर कोरोना रुग्णांच्या सेवेत काम केले. पुढे सप्टेंबरमध्ये मीच आजारी पडले. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जीवात जीव आला. उपचारातून बरी झाल्यावर ४० दिवसांनी पुन्हा कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झाले," मनीषा संजय पाटील सांगत होत्या.

सीपीआरमध्ये त्या नर्स म्हणून २०१५ ला रुजू झाल्या. कोरोनाची ड्यूटी लागल्यावर आपल्यामुळे कुटुंबीयांना त्याची लागण होणार का?, अशी विचारचक्र त्यांच्या डोक्यात फिरत होती. ही मानसिकता तिथल्या प्रत्येक नर्स व वॉर्ड ब्रदरची होती. 'भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी जेवणाचे काय, हा प्रश्न होता. खाणावळीतून डब्याची सोय केली. सीपीआरमधील अधिकारी, डॉक्टर्स (officers, doctors) यांनी मनोबल वाढविल्याचा चांगला परिणाम झाला. आजारी पडल्यावर घरच्यांची काळजी वाटली. बरे झाल्यावर मात्र पुन्हा सेवेत हजर झाले. येथे येणारे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय पाहून मन हेलावतं‌. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, मनीषा पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.'

हेही वाचा: Technology Day Special: विद्यापीठातील बहुपयोगी कॉमन फॅसिलिटीचा संशोधकांबरोबर, उद्योगांनाही होणार फायदा

मूळचे जतचे संतोष विठ्ठल गडदे वॉर्ड ब्रदर म्हणून येथे वर्षभर काम करतात. राहायला बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात आहेत. ते २०१३ ला सीपीआरमध्ये सेवेत दाखल झाले. "मनात भीती असणे, साहजिक होते. कामाला सुरुवात केल्यानंतर घरी परत कसे जायचे, पूर्ण सुरक्षितता घेऊनच घरात पाऊल ठेवतो. काही दिवसांपूर्वी मी कोरोना पॉझिटिव्ह आलो. त्यातून बरे झालो आणि पुन्हा कामावर हजर झालो. मला डेंगी झाला. पत्नी व आठ महिन्यांच्या मुलग्याला गावी पाठवले आहे. आई-वडील गावीच आहेत. माझ्यावर उपचार सुरू आहेत. त्यातून बरे होऊन पुन्हा कामावर हजर होईन," संतोषने सांगितले. "आजही नर्सेस व वॉर्ड ब्रदर यांचा डोळ्याला डोळा नाही. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येकावर कामाचा ताण आहे. एकमेकासमवेत गप्पा मारत मनावरील ताण हलका करत काम करत आहोत.

सीपीआरमध्ये ५३० नर्सेस, हंगामी सुमारे शंभरावर वॉर्ड ब्रदर काम करतात. प्रत्येकाचे काम जीव धोक्यात घालणारे आहे. दिवस-रात्र ते उल्लेखनीय सेवा बजावत आहेत. त्यामुळेच त्यांचे कोरोना योद्धे म्हणून काम मोलाचे आहे.

हेही वाचा: Benefits Of Tulsi Leaves: तुळशीचे पाने खाण्याचे हे आहेत फायदे