esakal | रुग्ण वाढल्यास पोलिस जबाबदार : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्ण वाढल्यास पोलिस जबाबदार : अजित पवार

रुग्ण वाढल्यास पोलिस जबाबदार : अजित पवार

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोणाचाही हस्तक्षेप करुन न घेता मी उपमुख्यंत्री म्हणून तुम्हाला आदेश देतोय की, कोल्हापूर जिल्ह्यात (kolhapur district) जे नियम लागू केले आहेत, त्यांची कडक अंमलबाजवणी झालीच पाहिजे. आता कारवाईची घोषणा नको तर कडक कारवाई करा. रुग्ण संख्यावाढत असताना विशेष पोलिस महानिरिक्षकांसह पोलिसांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री पवार ( deputy CM ajit pawar) यांनी दिला. यावेळी, आरोग्यमंत्री राजेश टोपे, (rajesh tope) पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.  

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग (covid patients increased) वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) आहे. त्याची अंमलबाजवणी झालीच पाहिजे. यामध्ये आता विशेष पोलिस महानिरीक्षकांनी लक्ष घातले पाहिजे.

हेही वाचा: कोल्हापुरात निर्बंध शिथिल करण्याबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण, (covid-19 vaccine) औषध पुरवठा, ऑक्‍सिजन (oxygen) पुरवठा जास्ती जास्त केला जाईल. जिल्ह्यातील कोरोना चाचण्या दहा हजारपर्यंत आहेत. त्या वीस ते पंचवीस हजारपर्यंत वाढवाव्यात. जितके रुग्ण वाढताहेत तितके रुग्ण वाढूदेत. पण एकदाच काही तो निकाल लागू दे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबई, पुणे, नागपूर येथे कोरोना संसर्ग वाढत होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण कमी होते. पहिल्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात खूप चांगले काम झाले. तर, दुसऱ्या लाटेत मात्र यामध्ये विस्कळीतपणा दिसत आहे. त्यामुळे आता कोणत्याही मंत्री, खासदार, आमदारांसह इतरांचा हस्तक्षेप करु न घेता कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊन करावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

loading image
go to top