Good News:शिराळाच्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचा दावा! कोरोना होणार आता छु मंतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Good News: शिराळाच्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचा दावा! कोरोना होणार आता छु मंतर

Good News: शिराळाच्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचा दावा! कोरोना होणार आता छु मंतर

शिराळा (सांगली) : शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल या कंपनीने (Isera Biological Company) कोरोनवर तयार केलेले इंजेक्शन राष्ट्राला व जगाला नवसंजीवनी देणारे असून कोरोनातून (Covid 19 vaccine) या जगभरातील मानवतेला वाचवणारे रामबाण औषध ठरेल. त्यामुळे या इंजेक्शनची क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने युद्ध पातळीवर परवानगी द्यावी यासाठी पाठपुरावा सुरू असून १०-१५ दिवसात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने (MP Dhyarshil Mane) यांनी व्यक्त केला. शिराळा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या आयशेरा कंपनीस दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते.

covid 19 vaccine made by Aisera Biological company based in Shirala sangli marathi news

यावेळी माने म्हणाले, याबाबत मी मुख्यमंत्री यांना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे माहिती दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरोग्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यावर १५ दिवसात सकारात्मक निर्णय होईल याची खात्री आहे. या कंपनीने 'अँटिकोव्हिड सिरम' नावाचे इंजेक्शन तयार केले आहे. एक किंवा दोन इंजेक्शन दिल्यानंतर कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो, असा दावा कंपनीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचे विषाणू टोचून घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके तयार करायची आणि मग अँटिबॉडीज् असलेल्या घोड्याच्या रक्तातील ‘अँटिसेरा' काढून तयार केलेले इंजेक्शन कोरोना रुग्णांना दिल्यास रुग्णांच्या शरीरातील कोरोना विषाणू नष्ट होतो असे कंपनीचे ठाम मत आहे.

या इंजेक्शनच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून, मानवी वापरासाठी आता या इंजेक्शनला आधी ‘ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया' आणि त्यानंतर 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' तथा 'आयसीएमआर'ची परवानगी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने परवानगी द्यावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा- शिरोळ दत्त साखर कारखाना उभारणार ऑक्सीजन प्लांट; शंभर सिलेंडरची होणार निर्मीती

आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचे संचालक नंदकुमार कदम आणि धैर्यशील यादव म्हणाले,कोरोनावरील 'कोव्हिशिल्ड' लस तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटशी या कंपनीचा कोव्हिडवर संशोधन आणि विकास करार आहे. सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प इत्यादी रोगांवरील प्रतिजैविके तथा अँटिबॉडीज् ही घोड्याच्या रक्तामध्ये त्या त्या रोगांचे जंतू टोचूनच बनविली जातात.

घोड्याच्या रक्तात कोरोनाचे विषाणू टोचून कोरोनाला खत्म करणारी प्रतिजैविके आम्ही तयार केली आहेत. कंपनीचे संचालक प्रतापराव देशमुख, डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व प्रीमियम सिरम या कंपनीच्या सहयोगातून या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. हे औषध तयार करण्यासाठी कंपनीच्या अनुभवी व तज्ज्ञ संचालकांसह तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर अविरत कष्ट, संशोधन व शेकडो प्रयोग केले आहेत. या औषधाच्या जनावरांवरील अनेक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कंपनीने आता या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी 'ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया'कडे परवानगी मागितली आहे. यावेळी गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, शिवसेनेचे अभिजित पाटील, निलेश आवटे, स्वप्नील निकम उपस्थित होते.

आमच्या रुग्णावर चाचणी करा. या कंपनीने इंजेक्शन तयार केलेली माहिती लोकांना समजल्याने कोरोनाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे अनेक नातेवाईक मृत्यूशी झुंज देणाऱ्या आमच्या रुग्णावर चाचणी करा पण औषध शोधा असे अनेक फोन आले असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.

covid 19 vaccine made by Aisera Biological company based in Shirala sangli marathi news

Web Title: Covid 19 Vaccine Made By Aisera Biological Company Based In Shirala Sangli Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid 19
go to top