esakal | शिरोळ दत्त साखर कारखाना उभारणार ऑक्सीजन प्लांट; शंभर सिलेंडरची होणार निर्मीती
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळ दत्त साखर कारखाना उभारणार ऑक्सीजन प्लांट; शंभर सिलेंडरची होणार निर्मीती

शिरोळ दत्त साखर कारखाना उभारणार ऑक्सीजन प्लांट; शंभर सिलेंडरची होणार निर्मीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरोळ (कोल्हापूर): कोरोना रुग्नांच्या वाढत्या संखेमुळे, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ऑक्‍सीजन अभावी अनेक रुग्न अत्यावस्थेत जात आहेत. ऑक्‍सीजनची कमतरता भासु नये म्हणुन येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या (Dutt sugar factory Shirol) वतीने ऑक्‍सीजन प्रकल्पाची (Oxygen plant)उभारणी करण्यात येणार आहे. येत्या चार आठवडयात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येवुन दिवसाला शंभर सिलेंडर ची निर्मीती करण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांनी दिली.

Oxygen plant to set up Shirol Dutt sugar factory kolhapur marathi news

पाटील म्हणाले, कोरोनाची राज्यातील गंभीर स्थिती आणि ऑक्‍सीजनची गरज लक्षात घेवुन, माजी कृषीमंत्री खा शरद पवार यांनी साखर उद्योगातील कारखानदारांना ऑक्‍सीजन निर्मीती करण्यारे प्लॅंट उभारण्या संदर्भात सुचना केल्या होत्या. नाशिक येथील मे साई नॉन कन्व्हेंशनल एनर्जी या नामवंत कंपनीस हा प्रकल्प उभारण्याचे काम दिले आहे. ताशी 25 मे क्‍युबीक क्षमतेचा हा प्रकल्प असुन, या प्रकल्पातुन 100 सिलेंडर ऑक्‍सीजन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे शिरोळ तालुका तसेच कोल्हापूर जिल्हयातील रुग्नांना दिलासा मिळणार आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा- 800 लसींसाठी 4000 जणांनी मध्यरात्रीपासून लावल्या रांगा, आटपाडी प्रकार

आपत्कालीन परीस्थितीत ज्या ज्या वेळी निर्माण होते. त्या त्या वेळी दत्त साखर कारखान्याने, सामाजिक बांधिलकी जपत आपले योगदान दिले आहे. यामुळे दत्त साखर कारखाना सभासद व कामगारांच्याबरोबरच परीसरातील नागरीकांना नेहमीच आधारवड ठरला आहे. नागरीकांनी आपली जबाबदारी ओळखुन घरीच सुरक्षित रहावे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. याप्रसंगी व्हा चेअरमन श्रेणीक पाटील, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील व खाते प्रमुख उपस्थित होते.

Oxygen plant to set up Shirol Dutt sugar factory kolhapur marathi news