esakal | ‘मामा, मास्क काढा, मास्क काढा साहेब; कोरोनाचा सल्ला पडला तरूणाला महागात!
sakal

बोलून बातमी शोधा

‘मामा, मास्क काढा, मास्क काढा साहेब; कोरोनाचा सल्ला पडला तरूणाला महागात!

‘मामा, मास्क काढा, मास्क काढा साहेब; कोरोनाचा सल्ला पडला तरूणाला महागात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना वैगेरे काही नाही, मास्क (Mask)काढा साहेब... असा मोपेडवरून फिरत तरुणाने काढलेला व्हिडिओ (Covid video Virl)व्हायरल झाला. त्या तरुणाने आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या बसलाही रोखण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. जुना राजवाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून संशयित तरुणाचा शोध घेऊन कारवाई केली.

covid 19 video viral rumors message kolhapur crime news

हेही वाचा- हॅलो साहेब... शेजाऱ्यानं कचरा रस्त्यावर फेकलाय; मुलही 'धिंगाणा' घालताहेत!

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

तरूण मोपेडवरून फिरत असून त्याने तोंडाला मास्क लावला नाही. ‘मामा, मास्क काढा, मास्क काढा साहेब, कोरोना वैगेरे काही नाही’ असे आवाहन करत व्हिडिओ तयार केला. तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्याने आॅक्सिजन वाहतूक करणारी केएमटी बसही अडवली. याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गस्तीपथकाला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर व नाईक शिवाजी पाटील यांनी सुरू केला. त्या तरुणाला क्रांतीसिंह नाना पाटीलनगर परिसरातून ताब्यात घेतले. त्याने सुहास पाटील असे नाव सांगितले.

covid 19 video viral rumors message kolhapur crime news