esakal | कोविड सेंटरमध्ये गाजताहेत राजकीय फड ; कोविडला ‘भूल’ देण्याची ‘मात्रा’
sakal

बोलून बातमी शोधा

covid center to discussion of quarantine patients on the topic of politics in kolhapur

निक आणि राज्य, देश पातळीवरील राजकारण चर्चिले जात आहे.

कोविड सेंटरमध्ये गाजताहेत राजकीय फड ; कोविडला ‘भूल’ देण्याची ‘मात्रा’

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्यांना वेळ घालवण्यासाठी ‘चर्चा’ हाच सर्वोत्कृष्ट उपाय ठरत आहे. विशेषतः लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये चर्चेचा सूर जरा अधिक उंचीवर दिसून येतो. शेती, उद्योग, नोकरी, व्यवसाय यापेक्षा ‘राजकारणात’ ते अधिक रमत आहेत. स्थानिक आणि राज्य, देश पातळीवरील राजकारण चर्चिले जात आहे. कोविडला ‘भूल’ देण्यासाठी ही ‘मात्रा’ उपयुक्‍त ठरत आहे. 

हेही वाचा -  आरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप 

कोरोनाविषयी सुरवातीच्या काळात सामान्यांच्या मनात जी भीती होती ती हळूहळू दूर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्दी, तापासारखी लक्षणे आढळल्यास रुग्ण स्वतःहून कोविड सेंटरमध्ये येऊन तपासणी करून घेत आहेत. रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यास सेंटरमध्ये दाखल होत आहेत. रोगाची लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग आहे. दहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत करायचे काय हाच त्यांच्यापुढे प्रश्‍न असतो. दिवसातून एकदा औषधांचा डोस, ठराविक कालावधीने ताप व आक्‍सिजन तपासणी व्यतिरिक्त उरलेल्या वेळात हे सर्व रुग्ण चर्चेला महत्त्व देत आहेत.

गावातील एखाद्या विषयावरून चर्चेला सुरवात होते. विषय कोणताही तो राजकारणाशी जोडला जातो. मग त्या विषयावरून समर्थन आणि विरोध सुरू होतो. एक प्रकारचा वादविवादच सुरू होतो. आवाजाची उंची वाढते. हातवारे सुरू होतात. यात काही काळासाठी ते आजार विसरतात. दरम्यान, ऑक्‍सिजन तपासण्यासाठी एखादा कर्मचारी वॉर्डात येतो आणि चर्चेला काही काळासाठी विराम मिळतो. इथे कोणाचा कोणावर राग नाही; परंतु चर्चेचे फलित मात्र सर्वांसाठी लाभदायी ठरत आहे. 

हेही वाचा - शिक्षण क्षेत्राचे ‘लॉक’ काढायला हवे 

निरोप देताना वातावरण भावूक

दहा दिवसांच्या कालावधीत एकत्र राहिलेल्या रुग्णांत एक प्रकारचा ऋणानुबंध तयार होत आहे. आधी आलेला रुग्ण बरा होऊन घरी जाऊ लागतो. त्यावेळी त्याला निरोप देताना वातावरण भावूक होते. घरी गेल्यावरही मोबाईलवरुन एकमेकाची काळजी घेतली जाते. दुःखाच्या प्रसंगातून प्रज्वलीत होणारी ही माणुसकीची ज्योत विचार करायला लावते.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top