esakal | संकेश्वरातील लग्नात पोलिसांचे 'सावधान'! वधु-वरासह 13 जणांवर गुन्हा

बोलून बातमी शोधा

संकेश्वरातील लग्नात पोलिसांचे 'सावधान'! वधु-वरासह 13 जणांवर गुन्हा
संकेश्वरातील लग्नात पोलिसांचे 'सावधान'! वधु-वरासह 13 जणांवर गुन्हा
sakal_logo
By
संजय पाठक - सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (बेळगाव) : संकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शासनाने घालून दिलेल्या कोविड मार्गसूचींचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन विविध घटनांमध्ये 13 जणांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारुन गुन्हा दाखल केला आहे. संकेश्वर येथे लग्नात गर्दी केली होती तर सोलापूर येथे यात्रा भरविण्यात आली होती.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी,

सोलापूर (ता. हुक्केरी) येथे कायदेशीर परवानगी न घेताच इराप्पा देवाची यात्रा भरविण्यात आली होती. त्यामुळे संकेश्वर येथील पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी घटनास्थळी जाऊन सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गौतम महावीर तळवार (रा. हंचिनाळ), अमर रवींद्र माळगी (रा. नेर्ली), संदीप बाबासाहेब हुक्केरी (रा. नेर्ली), अशिफ मुबारक मुल्ला (रा. नेर्ली), अमित राजगौडा पाटील (रा. सोलापूर), अंकित रवींद्र पाटील (रा. सोलापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्याची नावे आहेत. तर दुसऱ्या घटनेत नियमाचे उल्लंघन करून विवाह केल्यामुळे संकेश्वरात वधु-वरासह सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा- महापालिका-एकटी संस्थेचा उपक्रम; कोरोनामुळे खचून न जाता समाधानाने जगण्याचा सल्ला

यासंदर्भात संकेश्वर पोलिसातून मिळालेली माहिती अशी,

येथील निडसोसी रोडवरील मिलन हाॅलमध्ये गुरुवार (ता. 22) गायकवाड-दवडते विवाह सोहळ्यात 50 लोकांची परवानगी होती. पण प्रत्यक्षात 300 जणांना जमविल्यामुळे शासनाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी अभिषेक वसंत नाईक यांनी संकेश्वर पोलिसात फिर्याद दिली. याची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी हवालदार रमेश राजापुरे व सहकाऱ्यानिशी घटनास्थळी धाव घेत वधू-वरासह सात जणावर गुन्हा नोंद केला.

यामध्ये नवरा कार्तिक चंद्रशेखर गायकवाड (हुबळी), नवरी मेघा गणपती दवडते (संकेश्वर), झाकीरीया सौदागर (मिलन हाॅल मालक, संकेश्वर), चंद्रशेखर तानाजी गायकवाड (नवरदेवाचे वडील, हुबळी) ललिताबाई चंद्रशेखर गायकवाड (नवरदेवाची आई, हुबळी) गीता गणपती दवडते (वधुची आई, संकेश्वर), गणपती महादेव दवडते (वधुपिता, संकेश्वर) यांच्यावर संकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Edited By- Archana Banage