esakal | ‘शेल्टर होम’ची उमेद; ज्येष्ठांत जगण्याची ऊर्जा

बोलून बातमी शोधा

null

‘शेल्टर होम’ची उमेद; ज्येष्ठांत जगण्याची ऊर्जा

sakal_logo
By
- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : मी बेळगावचा कापड व्यापारी, पोराबाळांना मोठं केलं, शिकवलं. आता ते सेटल आहेत, मुलगी कोल्हापुरात सरकारी नोकरीत आहे; पण आता पोरं, सुनांचं आणि माझं पटत नाही. त्यामुळे मी घर सोडून आलो.

अलीकडे येथेच राहतो. आपल्या वाट्याला हे काय आले म्हणून रडत बसलो नाही, तर पुढे चालत राहिलो आणि आज येथे आहे. शाहू नाक्‍याजवळील शेल्टर होम अर्थात निराधारांच्या निवारा केंद्रातील ७२ वयाची ही व्यक्ती बोलत होती.

हेही वाचा- जिंदगीचा झालाय 'खेळ'; चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

कापड व्यापारी असूनही आज ते महापालिका आणि एकटी संस्थेच्या ‘शेल्टर होम’मध्ये राहतात. आज कोरोना महामारीमुळे नोकऱ्या जातील, पगार कमी होतील, व्यवसाय कमी होईल, या भीतीने काहींनी आत्महत्या केली. अपयशाला खचून गेले; मात्र या शेल्टर होममध्ये गेल्यानंतर कळते की आयुष्याच्या सायंकाळी सर्व काही उमेद कायम आहे.

कोल्हापुरात निराधार फिरताना, किंवा भीक मागताना फारसे कोणी दिसत नाहीत. कारण लक्ष्मीपुरीतील जुना कांदा-बटाटा मार्केट, मध्यवर्ती बस स्थानक, शिरोली जकात नाका आणि शाहू टोल नाक्‍याजवळ शेल्टर होमची व्यवस्था आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांना येथे ठेवण्यात येते.

रोज सकाळी-संध्याकाळी जेवण, चहा नाश्‍ताची सोय आहे. काही सामाजिक संस्थांचाही हातभार आहे. आयुष्यात मुलाबाळांना मोठं केले, शिकविलं, नोकरी-व्यवसायाला लावले, तरीही त्यांच्याकडून योग्य सांभाळ होत नाही. त्यामुळे गाव, शहर सोडून घरातून बाहेर पडलेले हे सर्व निराधार झाले आहेत. शेल्टर होममध्ये महाबळेश्‍वरमधील व्यक्तीशी संवाद साधला. माझं होतं ते सर्व घर, जमीन कुटुंबीयांना सोडून मी बाहेर पडलो आहे. झालं गेलं विसरून जायचं आहे. येथे सर्व ठीक आहे. कोणत्याही संकटाने कोणीही खचून जायची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकंदरीतच आयुष्यांच्या सायंकाळी त्यांनी सर्व गमावलं असलं तरीही त्यांची जगण्याची उमेद आजही कायम आहे.

Edited By- Archana Banage