
कोल्हापूर : कोविडची पहिली लाट चार वर्षांपूर्वी आली. या काळात कोविडसंदर्भात महापालिका प्रशासनाला काहीच माहिती नव्हती. त्यावेळी त्यांनी स्वयंसेवी संस्थांकडे मदत मागितली. त्याला प्रतिसाद देत स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या व सेवा दिली. परंतु त्या बदल्यात त्यांना द्यावे लागणारे बिल चार वर्षांपासून थकविले आहे. अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही. जीवन मुक्ती सेवा संस्था गेल्या चार वर्षांपासून साडेसहा लाख रुपयांच्या बिलासाठी महापालिकेकडे हेलपाटे मारत आहे. यामुळे यापुढे प्रशासनाने आवाहन केल्यास, त्याला किती प्रतिसाद द्यायचा, हे कोल्हापूरकर नक्कीच ठरवतील.