कोल्हापूरात मृतदेहासोबतच रुग्णालयासमोर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CPR administration protest today by the Black Panthers demand for The incumbent Dr. Chandrakant Mhaske and Dr. Hundred Action against Ramanand

निपाणी येथील प्रकाश पद्माना कांबळे उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झाले होते.

कोल्हापूरात मृतदेहासोबतच रुग्णालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : उपचारात हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ब्लॅक पॅंथरतर्फे सीपीआर प्रशासनाचा आज निषेध करण्यात आला. रुग्णाचा मृतदेह अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर ठेवून जोपर्यंत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के व डॉ. सौ. रामानंद यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तो स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला. कार्यकर्त्यांकडून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीपीआरच्या आवारात पोलिस बंदोबस्त होता.


निपाणी येथील प्रकाश पद्माना कांबळे उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झाले होते. उपचार सुरू असताना त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांकडून त्यांना व्हेंटिलेटर देण्याची मागणी झाली. प्रशासनाने व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. आज पहाटे कांबळे यांचा मृत्यू झाला. त्याला अधिष्ठाता म्हस्के व रामानंद कारणीभूत असल्याचा आरोप पॅंथरतर्फे करण्यात आला. तसेच या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेण्यात आली.

हेही वाचा-दादा गुरवार हाय खोटं बोलत नाही,  मावशी तुम्ही बरोबर आहात, अजिबात माघार घेऊ नका


अधिष्ठाताच्या पायर्‍यांवर बसून कार्यकर्त्यांनी सीपीआर प्रशासनाचा निषेध केला. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे सीपीआरच्या आवारातील वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी त्यांना अधिष्ठातांच्या कार्यालयासमोरच अडवले. आंदोलनात ब्लॅक पँथरचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, विश्वास कांबळे, दयानंद कांबळे, संभाजी लोखंडे, धोंडीराम कांबळे, बाबूराव जैताळकर, दयानंद शिरोलीकर सहभागी झाले होते.

हेही वाचा- ‘तो’ प्रस्तावच रुग्णांना तारणार ; दहा दिवसांत होणार नियोजन


गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधा द्या, हा माणसांचा दवाखाना आहे की कत्तलखाना आहे? येथे जिवंत माणसे मारली जातात का? कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर ठाण मांडले होते.

संपादन - अर्चना बनगे

Web Title: Cpr Administration Protest Today Black Panthers Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
go to top