
-शिवाजी यादव
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गुडघ्याच्या लिगामेंट बसविण्याच्या शस्त्रक्रिया तूर्त ठप्प आहेत. असे असताना जवळपास एक कोटी रुपये खर्चाचे आर्थोस्कोप साहित्य अनुषंगिक बाबींची खरेदी झाली आहे, असे साहित्य पडून आहे. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यव होताना रुग्णांना लिगामेंट बसविण्यासाठी खासगी रुग्णालयाकडे जावे लागत आहे.