

CPR Hospital Kolhapur
esakal
कोल्हापूर: राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांत उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी व सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयातही प्रत्यारोपणाची सोय होण्याचा मार्ग खुला झाला आहे.