कोल्हापूर : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तत्कालीन लिपिकासह पत्नीवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Suryavanshi Bunglow

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील तत्कालिन लिपिकासह त्याच्या पत्नीवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

कोल्हापूर : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तत्कालीन लिपिकासह पत्नीवर गुन्हा

कोल्हापूर - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी (Unaccounted Property) जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) भूसंपादन विभागातील तत्कालिन लिपिकासह (Clark) त्याच्या पत्नीवर (Wife) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला. सतिश गणपतराव सुर्यवंशी (रा. दिंडेनगर हौसिंग सोसायटी, पाचगाव) आणि त्यांची पत्नी अर्चना सुर्यंवंशी अशी त्यांची नावे आहेत. मालमत्तेची उघड चौकशीबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात येथे सतिश सुर्यवंशी हे तत्कालिन लिपिक म्हणून काम करत होते. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी व्हावी यासंबधी पोलिस उपायुक्त लाच लुचपत प्रतिबंक विभाग पुणे यांच्याकडून कोल्हापूर विभागाला आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार सुर्यवंशी यांच्या मालमत्तेची उघड चौकशी पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाचे स्त्रोतापेक्षा एकूण १९ लाख ७८ हजार ६६१ रुपयांची असंपदा (बेहिशेबी मालमत्ता) असून त्याचे प्रमाण १७.६८ टक्के असल्याची माहिती पुढे आली. यासंबधीची सर्व चौकशी पूर्ण करून संशयित सुर्यवंशी व त्यांची पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम १३ (१)(ई) सह १३(२) सह कलम १०९ प्रमाणे सरकारतर्फे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सुर्यवंशी यांच्या पाचगाव येथील घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती प्रक्रिया सुरू असल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास ते स्वतः करीत आहेत.

Web Title: Crime Against His Wife Clerk Case Of Unaccounted Property Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurcrimeWifeproperty
go to top