esakal | इचलकरंजीत तांबे मळ्यातील विहीरीत आढळला अनोळखी मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत तांबे मळ्यातील विहीरीत आढळला अनोळखी मृतदेह

इचलकरंजीत तांबे मळ्यातील विहीरीत आढळला अनोळखी मृतदेह

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : आमराई रोडवरील तांबे मळ्यात असलेल्या निर्जनस्थळी विहीरीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह तरंगताना निदर्शनास आला. मृतदेह अनोखळी असून त्याच्या अंगा, पायावर जबरी घाव असल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळी गावभाग पोलिस हजर झाले असून हा घातपात असल्याची चर्चा घटनास्थळी आहे.

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास देवमोरे मळ्यातील काही नागरिक तांबे मळ्यात फिरण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना विहिरीतून दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली. त्यावेळी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी त्वरित ही माहिती पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोलिस हजर झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांना एका पुरुषाचे चपला आढळून आले आहेत. निर्जनस्थळी विहरित तरंगणारा मृतदेह आढळल्याने नागरिकांनी गर्दी केली.

हेही वाचा: चिंताजनक! ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी वैद्यकीय पंढरीचा 'श्‍वास' गुदमरतोय

loading image