esakal | कोविड सेंटरमधून पसार झालेला न्यायालयीन बंदी अखेर जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटरमधून पसार झालेला न्यायालयीन बंदी अखेर जेरबंद

कोविड सेंटरमधून पसार झालेला न्यायालयीन बंदी अखेर जेरबंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : आयटीआय वसतिगृहातील (ITI kolhapur covid center) तात्पुरत्या कारागृहाच्या खिडकीचे गज काढून पसार झालेल्या दोघा न्यायालयीन बंदीना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. प्रतीक सुहास सरनाईक (रा. आर.के.नगर पाचगाव) आणि गुंडाजी तानाजी नंदीवाले (रा. तमदलगे, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. हातकणंगले तालुक्यात पोलिसांनी ही कारवाई केली. (crime case kolhapur two corona positive inmate found to police)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आयटीआय मुलांच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. येथे संशयित प्रतीक सरनाईक व गुंडाजी नंदीवाले दोघे न्यायालयीन बंदी सध्या कळंबा कारागृहात (kalamba jail kolhapur) होते. दोघांना पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक सहामध्ये ठेवले होते. १४ मे रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोघे संशयित खिडकीचे गज काढून पसार झाले. (covid centre) त्या दोघांचा जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संयुक्तरित्या शोध सुरू होता. (juna rajwada police station)

हेही वाचा: पालेभाज्या कडाडल्या; आवक घटल्याने दर वाढले

दरम्यान हातकणंगले तालुक्यात (hatkangale tehsil) ते दोघे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून पोलिसांनी त्या दोघांना जेरबंद केले. कारागृहातून पळून गेल्यानंतर त्या दोघांनी दोघे शेंडा पार्क परिसरातील एका बंद बंगल्याच्या टेरेसवर रात्र काढली होती. त्यानंतर ते दोघे पायी राधानगरी व भुदरगड तालुक्यात गेले होते. तेथून इचलकरंजीच्या दिशेने जात असताना हातकणंगले तालुक्यात त्या दोघांना जेरबंद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.