esakal | पालेभाज्या कडाडल्या; आवक घटल्याने दर वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

पालेभाज्या कडाडल्या; आवक घटल्याने दर वाढले

पालेभाज्या कडाडल्या; आवक घटल्याने दर वाढले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिपळूण : चक्रीवादळ (cyclone effects) तसेच पावसामुळे घाऊक बाजारात भाज्यांची (rate of vegetables) आवक कमी झाली असून सर्व भाज्यांच्या दरात वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. शहरात कठोर निर्बंध (lockdown rules) लागू असताना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होत होता. गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. (rate of vegetables increased in konkan effect of tauktae cyclone)

चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला (kokan area) बसला. पश्‍चिम महाराष्ट्रात (effecct on western maharashtra) वादळी वाऱ्यांमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. चिपळूणमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे येथून भाजीपाला येतो. या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसला. वादळी वारे तसेच पावसामुळे नुकसान झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली असून भाजीपाल्यांच्या भावांत वाढ झाली, अशी माहिती येथील भाजीविक्रेते राजेंद्र काबळी यांनी दिली. संचारबंदी सुरू असली तरी भाज्यांना मागणी वाढली आहे. (during lockdown rate increased) मागणी वाढल्याने आवक अपुरी पडली. परिणामी भाज्यांच्या भावांत वाढ झाली.

हेही वाचा: पालकांनो घाबरू नका, खबरदारी घ्या; लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांनी दिल्या टिप्स

"घाऊक बाजारात कांदा-बटाट्याची आवक कमी झाली असून कांदा-बटाट्याच्या दरांत वाढ झाली आहे. पालेभाज्यांना चांगली मागणी असून सोमवारी पालेभाज्यांच्या काही तासात विक्री झाली. पालेभाज्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे."

- स्वप्नील शिंदे, भाजी विक्रेता, चिपळूण

"चक्रीवादळ आणि पावसामुळे या आठवड्यात घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली."

- विलास गमरे, भाजी विक्रेता, अलोरे

हेही वाचा: PUBG फॅन्ससाठी आनंदाची बातमी; बॅटलग्राउंडचा टीझर प्रदर्शित