esakal | अवघ्या साडेचारशे रुपयांसाठी मित्राने केला मित्राचा घात
sakal

बोलून बातमी शोधा

crime case miraj Both arrested

 

दोघांना अटक : दोन तासात खुनाचा छडा 

अवघ्या साडेचारशे रुपयांसाठी मित्राने केला मित्राचा घात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : शहरातील माणिकनगर परिसरात केवळ साडे चारशे रुपयांसाठी दोघा जणांनी मित्राचा खून केल्याचा प्रकार आज घडला. गोविंदा व्यंकटेशराव मुट्टिकोल (वय 33) असे मृत तरूणाचे नाव आहे. या खूनाचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी केवळ दोन तासात छडा लावला. खून करणाऱ्या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिलिंद घनश्‍याम सादरे उर्फ मिरासाहेब (वय 52 रा.माणिकनगर, मिरज) आणि शक्ती मधुकर खाडे (वय 33,रा.मराठे मिल चाळ,मिरज) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. प्राथमिक तपासात या दोघांनी खुनाची कबुलीही दिली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

मृत गोविंदा मुट्टीकोल हा रेल्वेतील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. तो इमारती रंगवण्याचे काम करत असे. तो विवाहित असून सध्या त्याची पत्नी विभक्त राहते. गोविंदा याचे याच परिसरातील मिलिंद सादरे आणि शक्ती खाडे या दोघांशी मैत्रीचे संबंध होते. यापैकी एकास त्याने साडेचारशे रुपये उसने दिले होते. पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा मोबाईलही गोविंदा ह्याने काढून घेतला होता.

शनिवारी (ता.4) रोजी रात्री माणिकनगर येथील एका दारूच्या गुत्त्यावर हे तिघेही दारु पिण्यासाठी गेले होते. तेथे दारू पीत असताना उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून गोविंदाचा दोघा संशयितांशी वाद झाला. वादाचे पर्यवसान शेवटी मारामारीत झाले. मारामारीनंतर मिलिंद सादरे आणि शक्ती खाडे या दोघांनी गोविंदाला एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याच्या डोक्‍यात दगड घातला आणि धारदार शस्त्राने गळाही चिरला. यामध्ये गोविंदा हा जागीच ठार झाला. 

हेही वाचा- विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण लवकरच -


खून केल्यानंतर दोघेही संशयित पळून गेले. खुनाची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी केली. तेव्हा तपासात दोघा साथीदारांची नावे पुढे आली. त्यानंतर केवळ दीड तासात मिलिंद सादरे आणि शक्ती खाडे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत दोघांनी लगेच गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

संपादन - अर्चना बनगे