टीप दिल्याचा रागातून अमोल भास्करवर भरदिवसा सशस्त्र हल्ला

crime news
crime newscrime news
Updated on: 
Summary

भरदिवसा गजबजलेला ठिकाणी घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल पोलिस यंत्रणेने घेतली आहे.

कोल्हापूर : जवाहरनगरातील राहूल चव्हाणच्या खूनासाठी टीप दिल्याच्या रागातून अमोल भास्करवर आठ जणांनी सशस्त्र हल्ला केला. तलवार, गज, कोयता लोखंडी पाईपचा याचा वापर करण्यात आला. शिवाजी पेठ ते वाघबीळ रस्त्यावर भरदिवसा हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित रवि शिंदेसह आठ जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे - रवी शिंदे, प्रदीप कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेद सय्यद, सागर जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय कदम, अजित माने (सर्व रा. जवाहरनगर) अशी आहेत.

crime news
अवघ्या 48 तासांतच निर्णय फिरला; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल महादेव भास्कर हा जवाहरनगरात राहतो. तो बुधवारी (२२) सायंकाळी शिवाजी पेठेत मोटारीतून गेला होता. त्याने आरसी ग्रुपचा म्होरक्या राहूल चव्हाण याच्या खूनासाठीची टीप दिली आणि त्याच्या कुटुंबियाने रिअल इस्टेट, होलसेल किराणा व्यापारात प्रगती केली. या रागातून संशयित रवी शिंदे, प्रदीप कदम, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, सागर जाधव, प्रकाश कांबळे, अक्षय कदम, अजित माने या आठ जणांनी तलवार, कोयता, गज, लोखंडी पाईप घेऊन शिवाजी पेठ परिसरात हल्ला केला. शिवाजी पूल ते वाघबीळ जाणाऱ्या रस्त्यावर हत्याराने त्याच्या मोटारीची काच फोडली. त्यानंतर शिवागीळ, दमदाटी करत धमकीही दिली. अशी फिर्याद मध्यरात्री अमोल भास्करने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संबधित आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस संबधितांचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.

crime news
समाजाच्या दातृत्वातून साकारले सचिनचे घर

सीसी टीव्हीची मदत...

भरदिवसा गजबजलेला ठिकाणी घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल पोलिस यंत्रणेने घेतली आहे. परिसरातील सीसी टीव्ही आधारे त्यांनी संशयितांचा शोध सुरू केला. मात्र घडलेल्या या प्रकाराने जवाहरनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा भाग म्हणून बुधवार रात्री पासूनच या परिसरात राजारामपुरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com