बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न; राधानगरीच्या दोघांना अटक

कॅशिअरने अनिकेतने भरलेली रक्कम पुन्हा मोजण्यास घेतली.
बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न; राधानगरीच्या दोघांना अटक

कोल्हापूर : बनावट नोटांची (duplicate currency) छपाई करून राष्ट्रीयकृत बँकेत भरून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी (kolhapur crime) जेरबंद केले. उत्तम शिवाजी पोवार (वय २३, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) आणि अनिकेत अनिल हळदकर (वय २४, रा. चंद्रे, ता. राधानगरी) अशी त्या संशयिताची नावे आहेत. (crimecase)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित अनिकेत हळदळकर हा खासगी नोकरी करतो. तो २ ऑगस्टला राजारामपुरीतील एका राष्ट्रीयकृत बँकेत दुपारी गेला. त्याने खात्यावर दोन हजाराच्या ६७ नोटा अशी १ लाख ३४ हजाराची रक्कम भरली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. काहीवेळाने बँकेत दुसरा खातेदार पैसे (bank account) काढण्यासाठी आला. त्यावेळी कॅशिअरने अनिकेतने भरलेली रक्कम पुन्हा मोजण्यास घेतली. त्यावेळी त्यांना दोन हजाराच्या ६७ नोटांबाबत शंका आली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी अनिकेतला फोन करून बँकेत बोलवून घेतले. त्याला बँकेत जमा केलेल्या नोटा बनावट असल्याचे सांगितले. ते त्याने मान्य केले. तशी याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांना दिली. त्यापूर्वी अनिकेत तेथून गायब झाला. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री (५) अटक केली.

बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न; राधानगरीच्या दोघांना अटक
महत्वाची बातमी - शिष्यवृत्तीचे वेळापत्रक पुन्हा बदलले

चौकशीत त्याला या नोटा संशयित उत्तम पोवारने खपवण्यासाठी दिल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संशयित उत्तमचा शोध घेऊन त्यालाही मध्यरात्री अटक केली. तशी राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली. संशयितांनी यापूर्वी आणखी किती बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे का? याची माहिती पोलिस घेत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दिपीका जोंजाळ यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी समीर शेख, रंगराव चव्हाण, विशाल शिरगावकर, सत्यजित सावंत, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे आणि सायबर सेलचे सचिन बेंडखळे यांनी केली.

संशयित उत्तम पोवार हा संकणकीय व डिजीटल क्षेत्रात तज्ञ आहे. तो गेल्या एक वर्षभरापासून एका खोलीत बनावट नोटाची संगणक, प्रिंटरच्या सहायाने छपाई करत होता. त्याने या नोटा संशयित अनिकेतला खपविण्यासाठी दिल्या होत्या. अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी प्रिंटर, संगणक व बनावट नोटा तयार करण्याची सामुग्री ताब्यात घेतली आहे.

बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न; राधानगरीच्या दोघांना अटक
'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल

एकाच सिरीयलच्या १७ नोटा

संशयित अनिकेतने बँकेत भरलेल्या दोन हजाराच्या १७ नोटा या एकाच सिरीयलच्या असून त्याच्या वॉटर मार्कमध्ये तफावत असल्याचे कॅशिअरच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर बनावट नोटांचे हे प्रकरण पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com