जोडीदारानेच केला घात; नवऱ्याने केला बायकोचा निर्घुण खून

जोडीदारानेच केला घात; नवऱ्याने केला बायकोचा निर्घुण खून
Summary

शशिकांत व कोमल यांना तीन वर्ष व सहा वर्षे वयाची दोन मुले आहेत.

कणेरी : येथील चारित्र्याच्या संशयावरून निशिकांत चव्हाण (वय वर्ष ३२ सध्या रा. एकता कॉलनी, माधव नगर कणेरी मुळगाव दौलत नगर, कोल्हापूर) याने चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी कोमल निशिकांत चव्हाण (वय २८) हिचा काल रात्री दोनच्या सुमारास रस्सीने गळा आवळून निर्घुण खून केला. त्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र रस्सी तुटल्याने तो बचावला. आरोपी निशिकांत चव्हाण दीड महिन्यापूर्वी सदर कॉलनीमधील दीपक पोवार यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला होता. आरोपीस अटक करण्यात आली असून या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई चालू केली.

जोडीदारानेच केला घात; नवऱ्याने केला बायकोचा निर्घुण खून
केंद्राने केंद्राचे काम करावं, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. शशिकांत व कोमल यांना तीन वर्ष व सहा वर्षे वयाची दोन मुले आहेत. तर शशिकांत एम.आय.डी.सी.गोकुळ शिरगाव मध्ये कामास असून कोमल गृहिणी होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com