कैद्याचे मृत्यू प्रकरण : कोल्हापूरात सहा जणांवर खूनाचा गुन्हा | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

कैद्याचे मृत्यू प्रकरण : कोल्हापूरात सहा जणांवर खूनाचा गुन्हा

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Jail) शिवीगाळ केल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत कैद्याचा मृत्यू (Death) झाला. निशिकांत बाबूराव कांबळे (वय ४७, रा. शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सहा कैद्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा (Murder Crime) नोंद करण्यात आला. यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या तिघांचा समावेश आहे. सीसी टीव्हीतून हा प्रकार पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे - अक्षय तुकाराम काळभोर (वय २६), सचिन राजाराम ढोरे-पाटील (वय ३२, दोघे रा. पुणे), इलियास मुसा मुल्ला (वय ३३, रा. सांगली), बबलू संजय जावीर (वय ३३, रा. इचलकरंजी), किरण ऊर्फ करण प्रकाश सुर्यवंशी (वय ३७, रा. खानापूर, सांगली) आणि शिवाजी तिप्पन्ना कांबळे (रा. कोल्हापूर) अशी आहेत.

हेही वाचा: सार्वजनिक सुट्ट्या मूलभूत अधिकार नाही, सुट्ट्या कमी करण्याची वेळ - HC

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निशिकांत कांबळे हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला येथील दवाखान्याजवळील स्वतंत्र जागेमध्ये ठेवण्यात आले होते. कारागृहात संशयित शिवाजी कांबळे हा येथे शिक्षा भोगत आहे. संशयित अक्षय काळभोर, सचिन ढोरे-पाटील, बबलू जावीर हे तिघे मोका अंतर्गत कारवाईतील बंदी असून करण सुर्यवंशी आणि इलियास मुल्ला हे दोघे न्यायालयीन बंदी आहेत. तुरूंगाधिकारी विठ्ठल शिंदे हे काल कारागृहात कर्तव्य बजावत होते.

संशयित शिवाजी कांबळेने दुपारी निशिकांत कांबळेला शिवीगाळ केली. याचा राग निशिकांतला आला. त्यांच्यात भांडण झाले. यानंतर निशिकांतला अस्वस्थ वाटत असल्याची माहिती कारगृह प्रशासनाला मिळाली. त्यांनी त्याला तातडीन कारागृहातील रुग्णालयात व तेथून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले.

तुरुंगाधिकारी शिंदे यांनी सायंकाळी कारागृहातील सीसी टीव्हीची तपासणी केली. त्यावेळी निशिकांत याला संशयित अक्षय, सचिन, इलियास, बबलू, किरण आणि शिवाजी या सहा जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार पुढे आला. दरम्यान उपचार सुरू असताना निशिंकांतचा रात्री उशिरा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. यासंबधीची फिर्याद शिंदे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज दिली. त्यानुसार सहा संशयितांवर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे करीत आहेत.

हेही वाचा: जपानमधून व्हिसीद्वारे शपथ : प्रतिज्ञापत्र न्यायालयाने धरले ग्राह्य

सीसी टीव्हीतून प्रकार उघड...

निशिकांत संबधी नेमके काय घडले याची माहिती घेण्यासाठी अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कारागृहातील सीसी टीव्ही तपासले. यामध्ये संशयितांनी त्याला मारहण केल्याचा प्रकार समोर आला. या सीसी टीव्हीचा आधार घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

नातेवाईकांची सीपीआरमध्ये गर्दी

मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. येथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. निशिकांत सहा महिन्यात शिक्षा संपूण बाहेर येणार होतो. त्याच्याकडे आमचे डोळे लागले होते. पण त्यापूर्वी हा अनर्थ घडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते.

संशयितांचा घेणार ताबा...

खूनाचा गुन्हा दाखल झालेल्या सहा संशयिताचा न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurcrime
loading image
go to top