Crime: ८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या बंगाली कारागिराला अशा प्रकारे केली पोलिसांनी अटक

Latest Crime Update: पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Crime: ८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या बंगाली कारागिराला अशा प्रकारे केली पोलिसांनी अटक
Crime:sakal
Updated on

Kolhapur: दागिने घडवून देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या सराफी पेढ्यांकडून घेतलेले ८४ तोळे सोने घेऊन पसार झालेल्या काशीनाथ बिधान पात्रा (वय ४०, रा. पश्चिम बंगाल) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. १५ फेब्रुवारी २०१४ ला पाच कामगारांसह तो गायब झाल्याने गुजरी परिसरात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Crime: ८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या बंगाली कारागिराला अशा प्रकारे केली पोलिसांनी अटक
Alandi Crime : नवरदेवाची फसवणूक! पहिले लग्न लपवून नवरीने केले दुसरे लग्न

संशयित काशीनाथ पात्रा हा गुजरीतील कासार गल्लीत राहण्यास होता. येथे पाच कामगारांसोबत तो सोन्याचे दागिने बनवून देण्याचे काम करत होता. शहरातील सराफी पेढ्यांकडून चोख सोने घेऊन मजुरीच्या बदल्यात दागिने बनवत होता.

अनेक वर्षांपासून कोल्हापुरात असल्याने सराफांचा त्याचावर विश्वास होता. सराफांनी त्याच्याकडे दिलेले ५३ लाख ६४ हजार रुपयांचे ८४ तोळे सोने घेऊन तो १४ फेब्रुवारीच्या रात्री निघून गेला.

Crime: ८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या बंगाली कारागिराला अशा प्रकारे केली पोलिसांनी अटक
Nashik Crime News : लक्ष्मी ताठे यांनातेलंगण पोलिसांकडून अटक!

तो काम करत असलेल्या कारखान्याला कुलूप लावले होते. तसेच त्याचा भाऊ सोमन पात्रा, कारागीर शुभंकर माइती, बिटू, शंतनू, मॅनेजर सपन प्रामाणिक यांचेही मोबाईल बंद होते. यामुळे सराफांमध्ये घबराटीचे वातावरण होते.

याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित पसार होता. त्याला मंगळवारी रात्री अटक केली.

Crime: ८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या बंगाली कारागिराला अशा प्रकारे केली पोलिसांनी अटक
Chhatrapati Sambhajinagar Crime : घरफोड्यांचा धुमाकूळ; कुलूपबंद घरांतून नऊ लाखांचा ऐवज लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.