चोरट्यास अटक तीन गुन्हे उघडकीस; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update kolhapur Thief arrested for three offenses

चोरट्यास अटक तीन गुन्हे उघडकीस; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : मोटारसायकलसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. सुदेश ऊर्फ समाधान सुरेश माने (वय २०, रा. उचगाव, ता. करवीर) असे त्या संशिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला काल एक जण मोपेड विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परीख पुल परिसरात सापळा लावला. याठिकाणी थांबलेल्या तरूणाकडे पोलिसांनी विचारणा केली. संशयिताने त्याचे नाव सुदेश ऊर्फ समाधान असल्याचे सांगितले.

चौकशीत त्याने त्याच्याकडील मोपेड काही दिवसापूर्वी ताराबाई पार्क येथून चोरल्याचे सांगितले. त्याच्या खिशात सोने चांदीचे दागिने मिळून आले. त्याने हे दागिने मैत्रिणीने दिले असल्याचे सांगितले. पण तिने हे दागिने दिले नसल्याचे सांगितले. चौकशीत त्याने हे दागिने तामगावातील एका दुकानाचे शटर तोडून घरात प्रवेश करून चोरल्याची कबुली दिली. त्याने आणखी एक मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून मोपेड, मोटारसायकल आणि दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन, चार लहान अंगठ्या, पैंजणसह २५० रुपयांची चिल्लर असा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमंलदार ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, सागर माने, विकास चौगुले यांनी केली.

Web Title: Crime Update Kolhapur Thief Arrested For Three Offenses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top