
कोवाड : चिंचणे (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांना मगरीचे नदीकाठावर दर्शन होत आहे. बुधवारी दुपारी कचेरीपट्टी नावाच्या शेतात नदीतून गवतात आलेली मगर नागरिकांना दिसली. एकाच ठिकाणी वारंवार मगर दिसत असल्याने भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.