कुडित्रे : वसुंधरा दिन हा पृथ्वी आणि पर्यावरण संवर्धनाच्या जागृतीसाठी २२ एप्रिलला जगभर साजरा केला जातो. जागतिक तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढली आहे. याचा फटका शेतीलाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर तापमान वाढ रोखताना शेतीतील पाचट, धसकटे, तण, पिकांचे नको असलेले अवशेष न जाळल्यास कार्बन उत्सर्जन (Carbon Emissions) कमी होण्यासह तापमान वाढीला आळा बसण्याला हातभार लागू शकतो. शिवाय पिकांचे नको असलेले अवशेष न जाळता उभ्या जमिनीतच कुजविल्यास सेंिद्रय कर्ब वाढू शकतो. गरज आहे ती शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची.