
कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेच्या जॅकवेलमधील पंपांच्या यंत्रणेत वारंवार होत असलेला बिघाड, वितरणाचा बोजवारा यातून शहरवासीयांच्या शंका पक्क्या केल्या जात आहेत. ठेकेदारांची देणी, त्यांच्याकडून वारंवार होत असलेली मागणी व त्यातच बंद पडत असलेली यंत्रणा हे सारे एकमेकांमध्ये गुंतल्यासारखे दिसत आहे. महापालिकेकडून मात्र त्याबाबत ठोस माहिती दिली जात नाही. या प्रकारामुळे शहरवासीयांना ऐन उन्हाळ्यात वेठीस धरले जात आहे.