'पैसे द्या; नाहीतर...'; फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber crime

संशयित यादव याने एका तरुणाबरोबर फेसबुकवरून मैत्री केली.

'पैसे द्या; नाहीतर...'; फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात

कोल्हापूर : आम्हाला पैसे द्या; नाही तर तुम्हा पती-पत्नीचे अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी देऊन तब्बल ४५ हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संशयित राहुल यादव याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: विधान परिषदेसाठी कोल्हापुरात भाजपकडून अमल महाडिक

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित यादव याने एका तरुणाबरोबर फेसबुकवरून मैत्री केली. त्यानंतर त्याने फ्रेंडशिप करण्यासाठी मुली हव्यात का, अशी विचारणा केली. त्या वेळी त्या तरुणाने स्पष्ट नकार दिला. त्या वेळी यादवने त्या तरुणाला तुमचे फेसबुक अकौंट हॅक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने त्या तरुणाचे आणि त्याच्या पत्नीचे फेसबुक अकौंट हॅक केले. त्यावरील फोटो, व्हिडिओ मिळविले. ते मॉर्फ करून अश्‍लील व्हिडिओ बनवले आणि त्या तरुणाला दाखवले. मला ४५ हजार रुपये दिले नाहीस तर हे व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्या तरुणाने घाबरून संशयित यादवला फोन पेच्या माध्यमातून ४५ हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने हा तपास सुरू आहे.

हेही वाचा: जयंतरावांचे 'ते' खेळ सुरू राहणार?

loading image
go to top